Maharashtra Congress Statewide Resolve; Ajit Pawar Backward Class Campaign Launched



​समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर ‘अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विधा

.

​विभागीय स्तरावर बांधणी: अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण अशा सहा विभागांमध्ये राज्याची विभागणी करून पक्षबांधणी केली जाणार आहे.

​सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन: उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या सुनित्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.

​शासकीय योजनांचा लाभ: वंचित आणि दुर्बल घटकांसाठी असलेल्या शासकीय योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वय समिती काम करणार आहे.

​संघटनात्मक मजबुती: आगामी काळात जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठका, जनजागृती अभियान आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्यात येईल.

​या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या असून, त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

​विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. अजितदादांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे आहे. हे केवळ राजकीय कार्य नसून सामाजिक परिवर्तनाचे अभियान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *