![]()
लासूरस्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत यार्डातील महत्त्वाच्या सिमेंट रस्त्यांची आणि नवीन १७ कॉम्प्लेक्स गाळ्यांची कामे गेल्या महिनाभरापासून प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी दिली आहे.
.
दरम्यान बाजार समितीकडून या कामासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे तसेच पन्नास लाखांत जुन्या कॉम्प्लेक्स गाळ्यांवर वरच्या मजल्यावर आणखी नवीन १७ दुकानगाळ्याचे काम चालू करून संपूर्ण संचालक मंडळ एकजुटीने बाजार समितीचा विकास करीत आहे.
दरम्यान आमदार प्रशांत बंब आणि आमदार रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती शेषरावनाना जाधव व उपसभापती अनिल चव्हाणसह संपूर्ण संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत विकासकामे सुरू आहे. सध्या मका नंतर बाजारपेठेत तुरीची मोठी आवक येत आहे. जिल्ह्याभरातील दोन तीनशे वाहनातून दररोज शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असल्याने मोंढ्यात वाहनांची लक्षणीय संख्या वाढल्यामुळे रस्त्यावर वारंवार ट्राफिक जाम होण्याचा प्रकार वाढला आहे. त्यात बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने कायम वाहतूक ठप्प होत आहे. बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची लक्षणीय संख्या बघता बाजार समिती प्रशासनाने यार्डात नवीन तीन-चार सिमेंट रस्त्यांची कामे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही कामे अंतिम टप्प्यात असल्यामुळे भविष्यात नवीन रस्त्यामुळे बाजार समितीमधील मुख्य रस्त्यावर वाहनांची ट्राफिक जाम होण्याचा प्रकार थांबणार आहे.
वेअर हाऊस व रस्ते कामांना गती बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या विकासकामा बद्दल सभापती शेषरावनाना जाधव यांनी सांगितलेल्या गोष्टीत यार्डातील प्रमुख वेअर हाऊससह आडत व्यापारी दुकानासमोरील दोन उभे रस्ते आणि एक चाळणा संचाकडील आडवा तर टेलिफोन कडील अशा पाच सिमेंट रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. १७ नवीन दुकान गाळेसह बाजार समितीतील इतरही विकासकामे संपूर्ण संचालक मंडळाच्या विश्वासातून केली जात असल्याचे जाधव यांनी सांगितले.
