सर्वपित्री अमावस्येला 82 बेवारस अस्थींचे विसर्जन:राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त उपक्रमाचे 16 वे वर्ष

महाराष्ट्र




मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा, या माणुसकीच्या भावनेतून राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सर्वपित्री अमावस्येनिमित्त ८२ बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून नदीत विसर्जन करण्यात आले. या उपक्रमाचे यंदा १६ वे वर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाट येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक, विभागीय आरोग्य निरीक्षक सुनील तंवर, आरोग्य निरीक्षक निखिल शेंडगे, सचिन निकाळजे, विक्रम सरोदे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, डॉ. मिलिंद भोई, शिरीष मोहिते, सदाशिव कुंदेन, राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर, अमर लांडे, योगेश गोलांडे, रोमा लांडे, किरण फाळके, अक्षय खिवंसरा, अश्विनी बैकर, राजेश निकम, दीपक सुतार, गणेश ओरसे, प्रिया भोंडवे, सचिन देसाई, पल्लवी सरोदे, बाला शुक्ला, नगरसेवक राजेंद्र काकडे, लता राजगुरू, संजय मयेकर, अॅड. उमेश झाडे, मनीष अंदे, सागर पवार, सागर घम, भारतीय नौदलाचे विकास पोटावत्री, नम्रता पवार, मनीषा निंबाळकर, सुषमा खटावकर, विनायक घाटे, मनीष साळुंखे, माधव साळुंखे आणि आशिष जराड आदी उपस्थित होते. मंदार रांजेकर म्हणाले, हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार, मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केल्याने आत्म्यास शांती व मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. मात्र, अपघात किंवा अन्य कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या काही व्यक्तींची ओळख पटत नाही. अशा व्यक्तींच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी नातेवाईक उपलब्ध नसतात. त्यामुळे या मृतांनाही सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा आणि त्यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला हा उपक्रम राबविण्यात येतो.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *