BJPs Smart Move with Marathi Hindu Face for Mayor



मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्रथमच आपल्या ताब्यात आणण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने शनिवारी महापौरपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली. वॉर्ड क्रमांक 132 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रितू तावडे यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिके

.

या शर्यतीत तेजस्वी घोसाळकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे अशी नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या निवडीला अनेक राजकीय अर्थ जोडले जात आहेत. रितू तावडे यांनी 2017 मध्ये घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 121 मधून प्रथमच महापालिकेत प्रवेश केला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक 132 मधून विजय मिळवला. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले असून महिला मोर्चातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

18 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. सामाजिक आणि संघटनात्मक कामातून त्यांनी भाजपमध्ये आपली ओळख निर्माण केली. ईशान्य मुंबईत त्या आक्रमक आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेतील कामाचा अनुभव आणि संघटनातील भूमिका यामुळे त्यांची निवड पक्षासाठी सुरक्षित पर्याय मानली जात आहे.

रितू तावडे ज्या वॉर्ड क्रमांक 132 मधून निवडून आल्या आहेत, तो भाग गुजरातीबहुल म्हणून ओळखला जातो. विद्याविहार पूर्व, गारोडिया नगर, सोमय्या कॉलेज आणि राजावाडी रुग्णालय परिसर या वॉर्डमध्ये येतो. येथे गुजराती आणि जैन समाजाची मोठी वस्ती आहे आणि हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील असलेल्या रितू तावडे यांना या वॉर्डमधून निवडून आणत भाजपने महापौरपदासाठी पुढे केले आहे.

एकाच वेळी दोन संदेश

या निर्णयातून भाजपने एकाच वेळी दोन संदेश दिल्याची चर्चा आहे. मराठी चेहरा महापौरपदी बसवून मराठी मतदारांना संदेश देण्यात आला, तर गुजराती-जैन मतदारांचा विश्वास कायम ठेवण्यात आला. गुजराती मतदारांनी निवडून दिलेल्या मराठी उमेदवाराला महापौर बनवून भाजपने राजकीय समीकरणे चतुराईने जुळवली आहेत. त्यामुळे या निवडीकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीय रणनीती म्हणूनही पाहिले जात आहे.

पक्षाने संतुलन साधले

महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाने मराठी महापौर, हा मुद्दा पुढे करत भाजपवर टीका केली होती. भाजपने सुरुवातीला हिंदू महापौर, असा उल्लेख केला होता. मात्र, त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आता रितू तावडे यांच्या रुपाने मराठी चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे संभाव्य वाद टाळत पक्षाने संतुलन साधले आहे.

तावडे यांची निवड सत्तेची पहिली छाप

मुंबईच्या राजकारणात हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भाजपने पहिल्यांदाच महापालिकेची सत्ता मिळवली असून आता महापौरपदी रितू तावडे यांची निवड ही त्या सत्तेची पहिली छाप ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार कसा चालतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर म्हणून त्या प्रशासन आणि सभागृहात आपली भूमिका कशी निभावतात, यावर पुढील राजकीय समीकरणेही अवलंबून राहणार आहेत.

या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा….

मुंबई महापौर पदासाठी भाजपकडून रीतू तावडे, शिवसेनेकडून संजय खाडी रिंगणात:संघटनात्मक ताकद, राजकीय गणित लक्षात घेऊन निवड

कोण आहेत मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे:सभागृहात चार माजी महापौरांचे आव्हान; म्हणाल्या- मुंबईची सेवक म्हणून काम करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *