Chandrashekhar Bawankule Slams Rahul Gandhi Over NEET Paper Leak Controversy


“नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे. राहुल गांधींची ही केवळ नौटंकी सुरू असून काँग्रेसच्या काळात तब्बल 28 वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यांनी अगोदर स्वतःचा इतिहास तपासावा,” अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध

.

काँग्रेसने चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे

नीट पेपरफुटीवरून देशभरात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला. “राहुल गांधी स्वतःच एक नौटंकी आहेत आणि सध्या विद्यार्थ्यांच्या नावावर त्यांची नौटंकी सुरू आहे. काँग्रेसच्या काळात तब्बल 28 वेळा पेपर फुटले होते. मी त्याची यादी द्यायला तयार आहे. हा इतिहास पाहता त्यांनी ‘चुल्लूभर पाण्यात बुडून मरावे’.”

“पेपरफुटी होऊ नये, कारण यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान आणि मनस्ताप होतो, हे आम्हाला मान्यच आहे. मात्र, जशी ही घटना समोर आली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार केंद्रीय यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केली. एखादी घटना सिस्टीममध्ये घडली असेल, तर त्यासाठी थेट शिक्षणमंत्र्यांना किंवा सरकारला जबाबदार धरून विद्यार्थ्यांची माथी भडकवणे अयोग्य आहे,” असे बावनकुळे म्हणाले. तसेच, परवाच्या आंदोलनात घुसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवरही त्यांनी संशय व्यक्त केला आणि या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

उद्धव ठाकरेंना टोला, ‘स्वतःचे आमदार-खासदार सांभाळा’

उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन “आता सत्ता उलथवून टाकण्याची वेळ आली आहे,” असे विधान केले होते. यावर बोलताना बावनकुळे यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली. “सत्ता उलथवून टाकायला हे काय जोक सुरू आहे का? आता फक्त विकासाचे राजकारण करा. उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचे उरलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक सांभाळावेत. बाळासाहेब ठाकरेंनी जे कमावले होते, ते सर्व त्यांनी गमावले आहे. नागपूरमध्ये त्यांच्या सभेला 200 लोक होते, आता त्यांना जंतरमंतरवर कोण विचारणार आहे?” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

शरद पवार-मोदी भेटीचे स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीला कोणताही राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. “शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे अग्रगण्य नेते आहेत. विरोधी पक्षात असलो तरी एकमेकांची भेट घेणे, ही आपली संस्कृती आहे. यामध्ये कोणतेही नवीन राजकीय समीकरण शोधण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.

फडणवीसांसाठी नागपुरात महायज्ञ; अजित पवारांना श्रद्धांजली

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात संदीप जोशी आणि कार्यकर्त्यांनी भगवान नरसिंहाची पूजा करून महायज्ञाचे आयोजन केले होते. “या महायज्ञातून फडणवीस यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी अधिक ऊर्जा मिळेल आणि त्यांचे जीवन मंगलमय राहील,” अशी प्रार्थना केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. याचबरोबर, आज स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती असल्याने त्यांच्या स्मृतींनाही अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा

सत्र सुरू असताना संसदेबाहेर आंदोलन लोकप्रतिनिधीला शोभत नाही:राहुल गांधींच्या आंदोलनावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसेच, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शरद पवारांची पंतप्रधानांसोबतची भेट आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी

दिल्लीत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर घणाघात: म्हणाले- रावण आणि तुमच्यात फरक काय? फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काल त्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही,’ असा आरोप करत त्यांनी ‘तुमच्यात आणि रावणात फरक काय?’ असा सवाल सरकारला विचारला आहे. सविस्तर वाचा

जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक:CJP च्या कार्यकर्त्यांची सुटका; दावा- मंत्री नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *