शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट:जंतरमंतरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण




नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच जंतरमंतर येथे जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो नुकतेच समोर आले असून, राजकीय वर्तुळात या बैठकीची चर्चा सुरू झाली आहे. जंतरमंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. काल शरद पवार यांनीही स्वतः जंतरमंतरवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर लगेचच आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत काही चर्चा झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भेटीमागील कारणाबाबत उत्सुकता दरम्यान, या भेटीचे फोटो समोर आले असले तरी, ही भेट जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाली की ही केवळ एक सदिच्छा राजकीय भेट होती, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, दिल्लीत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि तापलेल्या वातावरणात शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हेही वाचा.. दिल्लीत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर घणाघात: म्हणाले- रावण आणि तुमच्यात फरक काय? फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काल त्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही,’ असा आरोप करत त्यांनी ‘तुमच्यात आणि रावणात फरक काय?’ असा सवाल सरकारला विचारला आहे. सविस्तर वाचा जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक:CJP च्या कार्यकर्त्यांची सुटका; दावा- मंत्री नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *