‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)कडून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावरून देशभरात तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कलाकार
.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. मात्र, सौरभ गोखले यांनी माध्यमांशी बोलताना वेगळी भूमिका मांडली.
प्रत्येक घटनेसाठी सरकारलाच दोष देता येत नाही
सौरभ गोखले म्हणाले, “मी सरकारविरोधी भूमिका कधीही घेणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारच जबाबदार असतं, असं मला वाटत नाही. ज्या घटना घडल्या त्याला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई झाली आहे. प्रशासन याबाबतीत कमी पडलेले नाही.”
त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त करताना, “आंदोलनात विद्यार्थ्यांसाठी चांगल्या गोष्टी मांडल्या जात आहेत. शिक्षणव्यवस्थेत सुधारणा व्हावी, ही त्यांची भूमिका समजू शकते,” असेही सांगितले.
आंदोलनाला वेगळा रंग दिला जातोय
मात्र, आंदोलनादरम्यान काही घोषणांबाबत त्यांनी आक्षेप घेतला. “हिंदू धर्माबद्दल आणि प्रभू श्रीरामांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आंदोलनाला वेगळा रंग दिला जातोय. कोणत्याही धर्माभिमानी हिंदूला हे मान्य होणार नाही. मलाही ते पटत नाही,” असे गोखले म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, “शिक्षणव्यवस्थेसाठी उपोषण किंवा आंदोलन करण्यामागील भावना मी समजू शकतो. पण त्यात वेगळे विषय आणून आंदोलनाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न झाला, तर त्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.”
लाठीचार्जनंतर देशभरातून प्रतिक्रिया
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, तर काहींनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.
दुसरीकडे, सौरभ गोखले यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी सहमती दर्शवतानाच आंदोलनाला धार्मिक किंवा राजकीय रंग देणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनावर मराठी चित्रपटसृष्टीतूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…
माणसाची किंमत इतकी कमी आहे, माहीत नव्हतं:विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पाहून मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक भावुक, व्हिडिओ व्हायरल

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद आता मनोरंजन क्षेत्रातही उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध नोंदवला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
विद्यार्थ्यांवर पुन्हा हल्ला केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही:लाठीचार्जच्या निषेधार्थ मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर करणे अत्यंत क्रूर असल्याचे सांगत, त्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज थेट दिल्लीतील जंतरमंतरवर जाणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
