![]()
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. बुधवार पेठेतील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या दत्तमंदिरासमोर ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे यांच्यासह सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, रांगोळी ही जमिनीवर साकारणारी कलाकृती आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले नेते आहेत. त्यामुळे रांगोळीद्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला. मंदिरासमोर साकारलेली ही रंगावली तब्बल २० बाय २५ फूट आकाराची असून, श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्या कलाकारांनी ती तयार केली आहे. ही रंगावली रविवार, दि. १ फेब्रुवारीपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असेल. अजित पवार यांना अभिवादन करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी युवा, तर रविवारी रंगणार बालसाहित्य संमेलन विवेक व्यासपीठ, विवेक साहित्य मंच, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण विवेक, विवेक नुक्कड साहित्य मंच, युवाविवेक, शिल्पकार चरित्रकोश, श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे मराठी ग्रंथालय आणि विदिशा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी यंदाचे युवा साहित्य संमेलन आणि रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी बालसाहित्य संमेलन रंगणार असून दोन दिवस वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांसह कला-संगीताची अनोखी पर्वणी रसिकांना विनामूल्य अनुभवता येणार आहे, अशी माहिती विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी दिली आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेते अॅम्फी थिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे दोन दिवसांचे संमेलन होणार आहे. शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या युवा साहित्य संमेलनाचा प्रारंभ सकाळी १० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘गाव हा माझा’ आणि अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या ‘रागमाला’ या कार्यक्रमांनी होणार आहे. तर युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आणि ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश खंडा’चे (उद्योग-अर्थकारण-क्रीडा आणि समाजकारण – राजकारण-पत्रकारिता) प्रकाशन सकाळी ११ वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला विश्वविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रंगावलीतून सन्मान:दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य कलाकृती साकारत अभिवादन
