सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ:राज्यपालांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ; ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री




अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबतच त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार आणि नेते उपस्थित होते. ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा अवघ्या दहा मिनिटांत साध्या पद्धतीने सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार शपथ घेण्यासाठी जात असताना, उपस्थितांकडून “अजित दादा अमर रहे, एकच वादा अजितदादा, वहिणीसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या. आतापर्यंतच्या घडामोडी थोडक्यात अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी आणि अनपेक्षित वळणे पाहायला मिळाली. बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर काही वेळातच अजित पवारांचा राजकीय वारसदार कोण? या चर्चांना उधाण आले. आज दुपारी विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी आमदारांच्या भावना आणि पक्षाची गरज ओळखून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. दिलीप वळसे पाटील यांच्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले आणि सुनेत्रा वहिनींच्या नावाची विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली. यानंतर तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे अधिकृत पत्र दिले. त्यानंतर राज्यपालांच्या संमतीने आज सायंकाळी विधानभवनात हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडला. पार पडला. राजकीय महत्त्व आणि आव्हाने दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. यापूर्वी अनेक महिलांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पदे भूषवली आहेत, मात्र उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अजित पवारांची प्रशासनावर असलेली पकड आणि त्यांची कामाची शिस्त सुनेत्रा पवार कशा प्रकारे पुढे नेतात, तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला कशा प्रकारे नेतृत्व देतात? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शपथ घेतल्यानंतर बारामतीला होणार रवाना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार आहेत. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दुखवटा संपेपर्यंत त्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याची असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *