अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच व्हाटसऍपवर क्राईम ग्रुप
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काही शब्द गुंड व्हाटसऍप गु्रप चालवतात. आपल्याला ज्या ठिकाणातून काही मोदक जमा करायचे आहेत. त्या ठिकाणचे काही फोटो त्या व्हाटसऍप गु्रपवर टाकून त्याच्यावर चर्चा सुरू होते आणि प्रशासनिक अधिकारी त्यास बळी पडतात. प्रशासनिक अधिकाऱ्यांना सुध्दा कोणाची केवढी किंमत करावी याची जाण नसल्याने हा प्रकार घडत असतो. कोणी तरी प्रशासनिक अधिकाऱ्याने या संदर्भाने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
या कलयुगामध्ये इतरांना झालेला त्रास हा त्याच्या कर्माची फळे आहेत आणि आपल्याला झालेला त्रास ही आपली परिक्षा आहे असे म्हटले जाते. इतरांच्या कर्माची फळे म्हणत असतांना आपल्या कर्माची ओळख आपल्याला सुध्दा व्हायला हवी. नाही तर आपल्या गालावर पडणाऱ्या खळीला पुन्हा मोठे फुलवून कसे लिहिले असे म्हणणारे कलाकार सुध्दा आता पडद्यामागे जाण्याच्या तयारीत आहेत.त्यानंतरच्या पिडीमधील शब्द गुंडांना पैसे कसे, कमी वेळेत, जास्त कमवावेत याचा आजार झाला आहे. त्यासाठी नवीन नवीन युक्त्या शोधल्या जातात.
काही पत्रकार या युक्त्यांमध्ये व्हाटसऍप गु्रपचा वापर करतात. त्यामध्ये पाहिलेल्या एका जाहीराती संदर्भाने आम्हाला सादर करायचे आहे की, पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे मालाबार गोल्ड ऍन्ड डायमंड्स या प्रतिष्ठाणाच्या जाहीरातीसह त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा बोर्ड तयार करून दिला होता. हा बोर्ड नांदेडमधल्या शिवाजीनगरमध्ये नव्हता तर नांदेडच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुध्दा होता. तसेच महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरामध्ये मालाबार डायमंड्सने आपले असे बोर्ड लावलेले आहेत. व्हाटसऍप गु्रपवर या बोर्डची फोटो काढून प्रसारीत केल्यानंतर अनेकांनी प्रसारण करणाऱ्याला समज सुध्दा दिली आहे की, असे बोर्ड सर्वत्र आहेत. तरी पण प्रसारण करणाऱ्याने आपली पोस्ट रिमुव्ह केली नाही. अशा वादग्रस्त पोस्ट रिमुव्ह करण्याचे अधिकार गु्रप ऍडमिनला पण असतात पण त्याने पण केली नाही. म्हणजे प्रसारण करणारा आणि गु्रप ऍडमिन या दोघांची मिली भगत आहे काय? अशी शंका येणारच. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी मालाबार प्रतिष्ठाणला सांगून तो बोर्ड काढून घ्यायला लावला. काय बेकायदेशीर होते त्यात? का काढायला लावला बोर्ड? अहो निलंबित पोलीस निरिक्षक सुध्दा मी काही चुकीचे केले नाही असे म्हणतात. मग या बोर्डमुळे काही निलंबनाची वेळ येणार नव्हती.
या बोर्डचा प्रसारणकर्ता कधी आपल्या गावाकडे जात असतांना आणि परत येत असतांना त्या भागातील शासकीय काम करणाऱ्या लोकांच्या वाहनांचे फोटो काढून याच गु्रपमध्ये टाकतो आणि त्यावर किती वाईट पध्दतीने शासकीय काम सुरू असल्याचे लिहिले जाते. पण ती वाहने किंवा ती माणसे आपल्या काही नैसर्गिक विधीसाठी थांबली असतील, काही खाण्या-पिण्यासाठी वस्तु घेण्यासाठी थांबली असतील असा विचार का होत नाही असे करून काय मिळणार. नांदेडचे प्रशासनिक अधिकारी एक दुसऱ्याला ती पोस्ट शेअर करतात आणि अशा चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांना वाव देतात. हीच असते काय पत्रकारीता हा प्रश्न नक्कीच या निमित्ताने समोर आला आहे.
Post Views: 58