नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार: पतीचे नपुंसकत्व लपवून फसवणूक:संभाजीनगरातील विवाहितेचा 15 लाखांसाठी छळ केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा




मुलाचे नपुंसकत्व लपवून ठेवत त्याचे लग्न लावून देत विवाहितेची फसवणूक केली. तसेच नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी 15 लाखांची मागणी करीत विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 20 मे 2025 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान खुटवडनगर (नाशिक) येथे घडला. या प्रकरणी पती, सासू, जाऊ, दीर, नणंद अशा 10 जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात 32 वर्षांच्या विवाहितेच्या फिर्यादीनुसार, महिलेचा विवाह 20 मे 2025 रोजी पार पडल्यावर पतीने नवस केला आहे असे सांगत शारीरिक संबंध टाळले. तिने डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली असता पतीने मारहाण व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या मंडळींना ही बाब माहिती असूनही त्यांनी पीडितेला गप्प राहण्याचा सल्ला दिला. पुढे सासरच्यांनी नाशिक येथे फ्लॅट खरेदीसाठी 15 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे दिल्याशिवाय शारीरिक संबंध होणार नाहीत, असे सांगण्यात आले. दागिने व शैक्षणिक कागदपत्रे काढून घेतले सासरच्यांनी महिलेचे सोन्याचे दागिने व शैक्षणिक कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेतले. नातेवाइकांच्या मध्यस्थीने ५ लाख रुपये व पतीच्या वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतरही मारहाण, धमक्या व मानसिक छळ सुरूच राहिला. 6 सप्टेंबर 2025 रोजी तिला जबर मारहाण करण्यात आली. पीडितेने तिच्या पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *