![]()
कर्जाच्या डोंगरातून सुटका करून घेण्यासाठी आणि 1 कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी लातूरमध्ये एका तरुणाने माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी या नराधमाने रस्त्यावर लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाला गाडीत बसवून
.
औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास एका स्कोडा कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आणि आतमध्ये असलेल्या चालकाचाही होरपळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. घटनास्थळी मृतदेहाजवळ एक कडे (ब्रेसलेट) आढळून आले, ज्यामुळे मृतदेह हा गाडीचा मालक गणेश चव्हाण याचाच असावा, असा समज निर्माण करण्यात आला.
पोलिसांनी असा उलगडला कट
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांना आला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत ‘मयत’ समजल्या जाणाऱ्या गणेश चव्हाण याचे कॉल डिटेल्स तपासले. त्यातून काही संशयास्पद धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता, ज्याचा मृत्यू झाल्याचे समजले जात होते, तो गणेश चव्हाण जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला 24 तासांच्या आत ताब्यात घेतले.
कर्जबाजारीपणातून सुचली भयानक कल्पना
आरोपी गणेश चव्हाण (रा. औसा तांडा) हा एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते, फ्लॅटचे हप्ते थकले होते आणि आर्थिक व्यवहार कोलमडले होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने 1 कोटी रुपयांचा विमा उतरवला आणि विम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला.
निरपराध वृद्धाचा बळी
आपला मृत्यू झाल्याचे सिद्ध करण्यासाठी गणेशला एका मृतदेहाची गरज होती. तुळजापूर टी-पॉईंट परिसरात गोविंद यादव नावाच्या एका वृद्धाने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. गणेशने त्यांना गाडीत बसवले, पुढे नेऊन त्यांचा थंड डोक्याने खून केला. त्यानंतर मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवून त्याने स्वतःची गाडी पेटवून दिली. ओळख पटवण्यासाठी त्याने स्वतःचे कडे मुद्दाम मृतदेहाजवळ टाकले होते, जेणेकरून पोलिस आणि नातेवाईक आपलीच ओळख पटवतील. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या भयानक कटाचा पर्दाफाश झाला आहे.
