महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा आज निकाल:सकाळी 10 पासून मतमोजणी, दुपारनंतर स्पष्ट होणार चित्र
![]()
महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाची दिशा स्पष्ट करणाऱ्या 29 मनपांसाठी गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 50% मतदान झाले. मुंबईत अंदाजे 51.59%, छत्रपती संभाजीनगरात अंदाजे 60 टक्क्यांवर मतदान झाले. नाशिकला 56.67, सोलापूरला अंदाजे 53, जळगावला 53.59, मालेगावला सुमारे 64, नागपूरला अंदाजे ५१, धुळे 56.72 टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी10 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. पहिला निकाल 12 वाजेपर्यंत अपेक्षित असून 29 मनपांचा कौल दुपारी 4 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
