![]()
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात शांततेत मतदान झाले. महापालिका प्रशासनाकडून अंदाजे आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार दिवसभरात ३ लाख ७ हजार ९ पैकी १ लाख ९७ हजार ५५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सुमारे ६४.३५ टक्के मतदानाची नोंद झाल
.
सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अवघे २० टक्केच मतदान झाले. सुरुवातीला निरुत्साह दिसून आला. बहुतांश प्रभागात दुपारनंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा टक्का २८ टक्क्यांनी वाढला. बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरच्या दोन तासातही मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत निवडणुकीबाबत उत्साह कमी असल्याने मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घडल्याचे चित्र आहे. दरम्यान, राधाबाई काळे महाविद्यालय, आयकॉन पब्लिक स्कूल, पेमराज सारडा महाविद्यालय येथील मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्वात शेवटी पावणेसात वाजता राधाबाई काळे महाविद्यालयातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्र. ५, ९, १०,१३ या चार प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला मतदार आघाडीवर राहिल्या. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ८ हजार १७९ महिला मतदारांनी तर ७८१८ पुरुषांनी मतदान केले. यात पुरुषांपेक्षा ३६१ महिला मतदार अधिक होत्या. प्रभाग क्र. ९ मध्ये ८५५१ महिलांनी, तर ८४९६ पुरुषांनी मतदान केले. येथे पुरुषांच्या तुलनेत ५५ महिला मतदार अधिक होत्या. तर प्रभाग क्र. १० व १३ मध्ये अनुक्रमे ४६ व ३७ महिला मतदार जास्त होते. प्रभाग १० मध्ये महिला मतदार १० हजार ९०३, पुरुष मतदार १० हजार ८५७, प्रभाग १३ मध्ये ७८८० महिला, तर ७८४३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीतील अर्थकारणावरून दिवसभर मतदार व नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मध्य शहरासह केडगाव, मुकुंदनगर सावेडी उपनगरातील विविध भागात हॉटेल्स, उपहारगृहे, चौकांमध्ये उमेदवारांनी मतदारांना घडवलेले लक्ष्मीदर्शन व काही प्रभागात अर्थकारणाने गाठलेला उच्चांक सर्वसामान्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू होता. सर्वाधिक सुशिक्षित मतदार असलेल्या सावेडीतील प्रभागातही अखेरच्या टप्यात लक्ष्मीदर्शन घडवण्याची वेळ आल्याने हाही चर्चेचा विषय ठरला. महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी आयकॉन शाळेत मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग. छाया : सिद्धार्थ दिक्षित. दिवसभर असे झाले मतदान { सकाळी ७.३० ते ९.३० : ७.८७ टक्के { सकाळी ९.३० ते ११.३० : २०.१६ टक्के { सकाळी ११.३० ते १.३० : ३३.९१ टक्के { दुपारी १.३० ते ३.३० : ४८.४९ टक्के { दुपारी ३.३० ते ५.३० : ६४.३५ टक्के मध्य शहर, केडगाव, मुकुंदनगर येथील प्रभाग वगळता इतर प्रभागांमध्ये परस्परविरोधी सक्षम उमेदवार नसल्याने मतदारांमध्येही निरुत्साह दिसून आला. विशेषतः दोन जागा बिनविरोध झालेल्या प्रभागात सर्वात कमी ५७ टक्के मतदान झाले. इतरही प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवक किंवा सक्षम असलेल्या उमेदवारांच्या तुलनेत विरोधी उमेदवार सक्षम नसल्याने मतदारांना मतदानासाठी सक्षम पर्याय नसल्याच्या चर्चा या प्रभागांमध्ये रंगल्या होत्या. त्यातूनच अनेक प्रभागात कमी मतदान झाल्याचे बोलले जात आहे.
प्रभागनिहाय मतदान व अंदाजे टक्केवारी प्रभाग १ – १४५३४ (६५.८०%), प्रभाग २ – १२१८४ (५६.६४%), प्रभाग ३ – ८४७४ (५८.३३%), प्रभाग ४ – १३२८७ (६९ %), प्रभाग ५ – १०२९६ (६३.९९%), प्रभाग ६ – ९७७६ (५७%), प्रभाग ७ – १०२०४ (६४%), प्रभाग ८ – १३५१५ (७५%), प्रभाग ९ – ११२६६ (६६.०८%), प्रभाग १० – १५.२८ (६९.०६%), प्रभाग ११ – १२३१७ (५९.३०%), प्रभाग १२ – ११५६९ (६०%), प्रभाग १३ – ९७४८ (६२%), प्रभाग १४ – १०७२३ (६३%), प्रभाग १५ – ११३५४ (६८.१७%), प्रभाग १६ – १३१०० (६९.४१%), प्रभाग १७ – १०१८० (६६.५९%).
