नवी मुंबईत 70 वर्षीय वनमंत्र्यांचे यादीत नाव सापडेना:4 केंद्रांच्या फेऱ्यानंतर केले मतदान, निवडणूक आयोगाच्या कारभाराचा मंत्री गणेश नाईकांना बसला फटका

0
orig_new-project-2026-01-16t070250546_1768527075.jpg



नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एका मतदाराला चार मते देण्याची पद्धत (प्रभाग पुनर्रचना) अवलंबल्याने मतदान केंद्रांमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. यामुळे गुरुवारी मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला. खुद्द राज्याचे ७० वर्षीय मंत्री आणि भाजप नेते गणेश न

.

कुटुंबाची ताटातूट; एकाच घरच्या सदस्यांना ३ केंद्रे

हा केवळ योगायोग नसून नियोजित कट असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. नाईक कुटुंबातील सर्व सदस्य ’बालाजी’ इमारतीत एकत्र राहतात, मात्र प्रशासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे चक्क ३ वेगवेगळ्या केंद्रांवर विखुरली होती. “सामान्य मतदारांना मतदानापासून परावृत्त करण्यासाठीच हा तांत्रिक खेळ खेळला जात आहे का?” असा संतप्त सवाल नाईक यांनी उपस्थित केला.

प्रशासकीय तमाशा : ४ केंद्रे बदलली, पण नाव मिळेना

गणेश नाईक सर्वात आधी प्रभाग ९४ मधील मनपा शाळेत गेले, तिथे नाव नसल्याने त्यांना राघो नाईक विद्यालयात धाडण्यात आले, तिथेही नाव नसल्याने नंतर प्रशासनाने त्यांना “सेंट मेरी स्कूल’चा रस्ता दाखवला. तिथे ज्या रूम नंबर ९’ मध्ये त्यांचे नाव असल्याचे सांगितले होते, ती रूमच त्या शाळेत अस्तित्वात नव्हती. मंत्र्याला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे, हा प्रशासनाचा घोर बेजबाबदारपणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed