Rohit Pawar Slams Election Commission; Fears Democracy Erasure



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य निवडणूक आयोग हा दात काढलेल्या वाघासारखा असल्याची टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यात भाजपने निवडणूक आयोगरुपी वाघाचे दात काढल्याचे दिसून य

.

राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. त्यात अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जाण्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी बोगस मतदारही आढळून आलेत. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच एका व्यंगचित्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोग दात काढलेल्या वाघासारखा असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, महापालिकेच्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. आधी मतदान यंत्रणेत बिघाड, नंतर बोटाला लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करायला देखील विलंब केला जात आहे. अनेक केंद्रांमध्ये तर EVM क्रमवारीनुसार लावलेले नाहीत तर दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टारचं चिन्हही नाही… एकूणच काय तर मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचं काम खुद् निवडणूक आयोगाकडूनच होतंय. अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी जाहीर केली जात नाही.. त्याऐवजी सायंकाळी एकत्रच ही टक्केवारी वाढवून बोगस मतदारांसाठी सोय करण्याचा तर हा प्रकार नाही ना? निवडणूक आयोगाने या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन ठराविक वेळेनंतर आकडेवारी जाहीर करावी अन्यथा आज मतदानाची शाई जशी पुसली जातेय तसं उद्या लोकशाही पुसली जाऊ नये, याची भीती वाटते, असे ते म्हणाले.

नियम डावलून शाईऐवजी मार्करचा वापर

रोहित पवार आपल्या अन्य एका पोस्टमध्ये म्हणाले, Conduct Of election Rules 1961 च्या नियम 49 K मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की, मतदान करण्यासाठी आलेल्या प्रत्येक मतदाराला काढता किंवा पुसता न येणारी (indelible) शाई लावण्यात यावी. असं असताना राज्य निवडणूक आयोगाकडून मात्र शाईऐवजी मार्कर वापरण्यात येत असून त्याने केलेली खून लगेचच पुसली जात आहे. नियम हे कायद्याच्या पुस्तकात लिहून ठेवायला असतात प्रत्यक्षात आम्ही करु तो कायदा’ अशीच निवडणूक आयोगाची मग्रुरी सुरुय. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोकादायक असून या शाईच्या माध्यमातून लोकशाही पुसण्याचं काम सुरू आहे.

महाशक्तीच्या दबावातून मार्करचा वापर

मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून अशी शाई वापरण्यात आली की या शाईमध्येही भ्रष्टाचार झाला? याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. तसंच अनेक ठिकाणी दुबार मतदार असूनही तिथं डबल स्टार दिसत नाही, याचा अर्थ काय? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *