देशात व राज्यात सत्ता, आता महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आष्टी जिल्हा परिषदमध्ये महायुतीचा झेंडा फडकवणार – भागवत देवसरकर
देशात व राज्यात सत्ता, आता महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आष्टी जिल्हा परिषदमध्ये महायुतीचा झेंडा फडकवणार – भागवत देवसरकर
नांदेड दि. 29 –
देशात व राज्यात महायुतीच सरकार आल्यावर पदाधिकारी भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे, येणार्या काळात महायुतीच्या पदाधिकार्यांच्या व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व जोरावर जिल्हा परिषद आष्टी गटात महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी आष्टी जिल्हा परिषद गटातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते माजी सरपंच बापूरावजी धारके, प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर पाटील कोळीकर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष एकनाथ जाधव, तालुकाध्यक्ष अमोल कदम रुईकर, भाजपाचे तालुका बूथसंयोजक बाळूभाऊ देशमुख, सहकार आघाडीचे संयोजक राजू मोरे वाळकीकर, शिवसेनेचे गणप्रमुख माधव सूर्यवंशी, भाजपा ओबीसी मोर्चाचे ओम इंदेवार, शंकर जगदाळे, मोरेश्वर माने, स्वप्नील रामगिरवार, गणेशराव पिसाळ यांच्यासह विविध शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना भागवत देवसरकर यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विधानसभेमध्ये बाबुराव कदम कोहलीकर यांना निवडून आणण्यासाठी आष्टी जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकार्यांनी मेहनतं परिश्रम घेतल्याबद्दल आभार व्यक्त, सगळ्यांच स्वागत केले. येणार्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर देणार देत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून अशीच आघाडी कायम ठेवून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महायुतीचा आष्टी जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवणारच असल्याचे देखील भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.
सत्कार समारंभ सोहळ्यास शेख रहीम, सुनील पाटील देवसरकर, अविनाश कदम, अनुप कदम, उपसरपंच देवानंद वानखेडे, बाळू पाटील धानोरकर, बाळू भाले प्रकाश आडे, संतोष ढोबळे, नारायण इंगोले, अरविंद हुंडेकर, सतीश शिंदे, गजानन चव्हाण, देवानंद सूर्यवंशी, विनोद जाधव, अनुज भंडारे, गजानन जायनुरे, विकी कोंडामंगल, संतोष पिसाळ, धुनाजी हुंगे, सतीश डोंनगे, गंगाधर मंचरवाड, धनंजय वाढवे, रामा फिशके, अनिल देवसरकर, दयानंद चव्हाण, विनोद जाधव, दिलीप आरबट, बापूदास देशमुख यांच्यासह आष्टी जिल्हा परिषद गटातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी व महायुतीच्या सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख, विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे पदाधिकारी हरिदास चिंतले यांचे वडील कै. संताजी चिंतले यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने एक मिनिट मौन पाळून कै.संताजी चिंतले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.