नाशिकराेडचे 17 काेटींचे सभागृह बेवारस:पीडब्ल्यूडी म्हणे पत्र दिले, मनपा म्हणते अभ्यास सुरू, वर्षभरापूर्वी अजितदादांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली




नाशिकरोड येथील राज्य शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह 17 कोटी रुपये खर्च करुन उभारले आहे. देखभालीचा खर्च कोण करणार यावरुन राज्य शासन आणि महापालिका यांच्यामध्ये जुंपल्याने उद्घाटनापूर्वीच त्याची दुरवस्था झाली आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या कार्याकाळापासून चव्हाण सभागृहाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. मात्र 12 वर्षांचा कालावधी लोटला तरी सभागृह खुले केलेले नाही. 16 फेब्रुवारी 2025 ला नाशिकरोड येथील न्यायालय इमारतीचे लोकार्पण होत कार्यक्रमही याच सभागृहात जाला होता. आजितदादांनी तेव्हाच हे सभागृह महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वर्ष होऊनही सभागृह महापालिकेने ताब्यात घेतले नाही. या सभागृहाच्या गेटवर गाजरगवत उगवले असून जागोजागी पडझड झाली आहे. तरीही याकडे लक्ष दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. हस्तांतराबाबत पत्रव्यवहार यशवंतराव चव्हाण सभागृह हे पूर्णपणे तयार झाले असून त्यासाठी 17 कोटी रुपये रुपये खर्च आला आहे. सभागृह हस्तांतरित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विभागीय आयुक्तालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. – सचिन शेळके, अभियंता सा. बां. विभाग राज्य शासनाला अहवाल चव्हाण सभागृहाबाबत राज्य शासनाचे पत्र आलेले आहे. मात्र यावर अभ्यास करण्याची गरज आहे. सभागृहाचा होणारा देखभाल खर्च, येणारा निधी या सर्व बाबी तपासून राज्य शासनाला अहवाल पाठवण्यात येणार आहे. – सुवर्णा दखणे, उपायुक्त, मनपा विभागीय प्रशिक्षण प्रबोधिनीने दिला नकार विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील हे सभागृह चालविण्यासाठी विभागीय प्रशिक्षण प्रबोधिनीला विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी अनुभव नसल्याचे कारण देत नकार दिला. हे सभागृह महापालिकेला देण्यात यावे असा पर्याय पुढे आला. तसेच स्व. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनीही नाशिकरोड न्यायालयाच्या उद््घाटनाच्या वेळी स्पष्टपणे हे सभागृह महापालिकेला हस्तांतरित करण्यात यावे, असे सांगितले होते. तूर्तास महापालिका यावर विचारविनिमय करुन राज्य शासनाला अहवाल पाठवणार आहे. नाट्यप्रेमींसाठी सभागृह सुरू करा नाशिकरोड, देवळाली कँम्प, भगूर येथील नाट्यप्रेमींसाठी हे सभागृह महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक वेळेस नाशिकला जावे लागते. नाटक रात्री उशिराने संपत असल्याने येण्याजाण्याची अडचण होते. त्यामुळे हे सभागृह तत्काळ खुले करावे – तन्वी अमित, लेखिका, कवयित्री नाशिकरोडचे 17 कोटींचे सभागृह बेवारस नाशिकरोडच्य विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या प्रवेशद्वारीच असे गाजरगवत वाढले असून लवकर उद्घाटन होत नसल्याने आतमध्ये प्रचंड दुरवस्था झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *