हिंगोलीत गुड्डू बांगर यांची स्वीकृत सदस्य पदी निवड निश्चित:शिवसेनेच्या आमदाराकडून 20 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्त्याला निष्ठेचे फळ




हिंगोली नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य मध्ये शिवसेनेकडून दोन सदस्यांचे नावे अंतिम करण्यात आली असून यामध्ये मागील वीस वर्षापासून आमदार संतोष बांगर यांची सावली म्हणून सोबत राहणार आहे गुड्डू बांगर यांना शिवसेनेकडून निष्ठेचे फळ दिले आहे. हिंगोली पालिकेत त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड निश्चित झाली आहे. या निवडीवर शुक्रवारी तारीख 16 शिक्कामोर्तब होणार आहे हिंगोली नगरपालिकेमध्ये आमदार संतोष बांगर यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 34 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दहा जागा जिंकल्या आहेत. याशिवाय भाजप आणि पाच तर काँग्रेसने दोन जागांवर यश मिळवले आहे. तर नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या रेखा श्रीराम बांगर विजय झाल्या. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची एखादी सत्ता मिळवल्यानंतर आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य कोणाची निवड होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. दरम्यान स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेनेचे दोन, भाजपला एक तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यानुसार आज शिवसेनेचे त्यांच्या दोन सदस्यांची नावे अंतिम केली आहेत यामध्ये नितीन बांगर व गुड्डू बांगर यांचा समावेश आहे. तर भाजपा कडून कैलास शहाणे व राष्ट्रवादीकडून शकील यांचे नाव निश्चित झाले आहे. मागील वीस वर्षापासून आमदार संतोष बांगर यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गुड्डू बांगर यांची ओळख आहे. आमदार संतोष बांगर ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होते तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षाचे काम करणेच पसंत केले होते. यावेळी हिंगोली पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आल्या नंतर आमदार संतोष बांगर यांनी पालिकेवर स्विकृत सदस्य म्हणून गुड्डू बांगर यांची निवड केली आहे. शुक्रवारी तारीख 16 नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यांच्या निवडीमुळे एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *