मराठी गायिकेला भररस्त्यात शिवीगाळ:'वन वे'ची आठवण करून देताच वाहनचालक श्रीनिधी घटाटेंवर गेला धावून; व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी




सध्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे ‘रोड रेज’चे प्रकार प्रचंड वाढले आहेत. असाच एक संतापजनक अनुभव प्रसिद्ध मराठी गायिका श्रीनिधी घटाटे आणि तिच्या होणाऱ्या पतीला आला आहे. इमॅजिका रिसॉर्टजवळ वाहतूक कोंडीत अडकले असताना, चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या एका जोडप्याने श्रीनिधी आणि तिच्या पतीला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ स्वतः श्रीनिधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून, गुंडांसारखे वागणाऱ्या या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तिने महाराष्ट्र पोलिसांकडे केली आहे. नेमका प्रकार काय घडला? गायिका श्रीनिधी घटाटेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आणि सविस्तर पोस्ट शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. श्रीनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ती आणि तिचा होणारा पती त्यांच्या फार्महाऊसकडे जात होते. त्यावेळी इमॅजिका रिसॉर्टजवळ त्यांना प्रचंड मोठ्या ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि अनेक लोक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या बाजूने गाड्या चालवत होते. समजावून सांगायला गेले अन् अंगावर धावून आले याच गोंधळात चुकीच्या लेनमधून भरधाव येणाऱ्या एका वाहनाने श्रीनिधीच्या गाडीला जवळपास धडक दिलीच होती. यावेळी श्रीनिधीच्या होणाऱ्या पतीने अत्यंत शांतपणे त्या वाहनचालकाला गाडी योग्य लेनमधून चालवण्याची विनंती केली आणि हा ‘वन-वे’ रस्ता नसल्याची आठवण करून दिली. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी त्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने आक्रमक होत श्रीनिधीच्या पतीला अत्यंत वाईट भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर ते मारहाण करण्याच्या उद्देशाने अंगावरही धावून आले. अशी माहिती श्रीनिधीने दिली. “नियम पाळणाऱ्यांनाच धमकावले जाते का?” या घटनेनंतर श्रीनिधीने सोशल मीडियावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये विचारले आहे की, “कायदा पाळण्याची हीच किंमत आपल्याला मोजावी लागते का? आज जे प्रामाणिक नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात, त्यांना अशा प्रकारे धमकावले जात आहे. तर दुसरीकडे नियम पायदळी तुडवणारे लोक गुंडांसारखे उजळ माथ्याने रस्त्यांवर फिरून इतरांवर दादागिरी करत आहेत. हा प्रकार अत्यंत त्रासदायक आणि संतापजनक आहे.” महाराष्ट्र पोलिसांच्या महासंचालकांना टॅग करत कारवाईची मागणी रस्त्यावरील या गुंडगिरीचा व्हिडीओ शेअर करताना श्रीनिधीने थेट महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP Maharashtra) टॅग केले आहे. “अशा बेजबाबदार आणि हिंसक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी मला आशा आहे. ज्यांना आपली गुंडगिरी ही कायद्यापेक्षाही मोठी वाटते, अशा लोकांच्या भरवशावर आपण आपले रस्ते सोडू शकत नाही,” अशी परखड भूमिका श्रीनिधीने मांडली आहे. श्रीनिधी घटाटेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेा व्हिडिओ.. दिंडीवर काळाचा घाला:पंढरपूरच्या आषाढी वारीतील 7 वारकऱ्यांना ट्रकने उडवले, जेजुरीजवळ 3 महिला भाविकांचा मृत्यू, 4 जखमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढावला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, चार वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *