BMC Elections BJP Ashish Shelar Criticizes Thackeray MNS Alliance Mahayuti Plans Win Seats | शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच: ठाकरे बंधूंच्या युतीवर आशिष शेलारांची बोचरी टीका, म्हणाले- कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील – Mumbai News
![]()
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा
.
शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीबाबत बोलताना आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण सन्मान दिला जात असून ते आमचेही नेते आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट आणि आरपीआय यांची बैठक झाली असून आम्ही 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. जागावाटपाबाबत बोलताना, आवश्यकतेनुसार योग्य वेळी जागा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना विचारले की, ठाकरेजी, तुमचा महापौर नेमका कोणत्या मोहल्ल्यातून येणार आहे? त्यांनी ठाकरे गटातील अंतर्गत मतभेदांवरही बोट ठेवले. उद्धव ठाकरेंना मानणारा आणि आदित्य ठाकरेंना मानणारा गट आता वेगळा झाला आहे, या वास्तवावर उद्धव जी किती काळ पांघरुण घालणार? असा सवाल करत त्यांनी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली आहे.
दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अधिकृत प्रसिद्धीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
