नांदेड (प्रतिनिधी)- येथील उस्मान मेडिकलचे संचालक हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची नमाज-ए-जनाझा (अंत्यविधीची प्रार्थना) उद्या म्हणजेच शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता बडी दर्गा, गाडीपुरा, नांदेड येथे होईल.उस्मानभाई स्वतः जेव्हा काम कारायचे तेव्हा रात्री २ वाजता जरी जाऊन त्यांच्या दुकानामागे असलेल्या घराची कडी वाजवली तरी ते रुग्णांना हसत मुखाने प्रतिसादात देत असत आणि औषधी देऊन घाबरू नका सर्व काही ठीक होईल असे म्हणत असत.परिवारत्यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तसाच प्रतिसाद देतात जसा उस्मानभाई देत होते.नांदेड आहारात ५५ -६० वर्ष वय असेलेले सर्व नागरिक उस्मान भाईला ओळखतात. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार लुलानिया कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.
Post Views: 111
