Major theft at the house of dismissed IAS Pooja Khedkar | बडतर्फ IAS पूजा खेडकर यांच्या घरी मोठी चोरी: औंध निवासस्थानी आई-वडील, वॉचमनसह पाच जण बेशुद्ध आढळले – Pune News



बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंध येथील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पूजा खेडकर यांचे आई-वडील, घरातील वॉचमन, वाहनचालक आणि कुक असे एकूण पाच जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्या

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चतुःशृंगी पोलीस ठाण्यात औंध परिसरातील साकाळ नगर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील बंगला क्रमांक ११२ येथे चोरी झाल्याची माहिती फोनद्वारे मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पूजा खेडकर यांच्यासह त्यांचे दोन भाऊ विनय बुधवंत आणि हर्षद बुधवंत उपस्थित होते. पाहणीदरम्यान, कार पार्किंग परिसरात वॉचमन जितेंद्र सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर पूजा खेडकर यांनी पोलिसांना त्यांच्या आई-वडिलांची खोली दाखवली, जिथे दोघेही पलंगावर बेशुद्ध अवस्थेत होते. खोलीतील लाकडी कपाटे फोडलेली असून त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

बंगल्यातील इतर तीन खोल्यांची तपासणी केली असता, तेथेही कपाटांमधील सामान विखुरलेले आढळले. यानंतर रुग्णवाहिका बोलावून पूजा खेडकर यांचे आई-वडील आणि वॉचमन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपासात तळमजल्यावरील एका खोलीत वाहनचालक दादासाहेब ढाकणे आणि बंगल्याच्या बाहेरील खोलीत कुक सुजित रॉय हेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.

दरम्यान, पूजा खेडकर यांना तक्रार दाखल करण्याबाबत विचारले असता, आई-वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने सध्या तक्रार देणे शक्य नसून, नंतर तक्रार देऊ, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, चोरीत नेमके काय आणि किती साहित्य लंपास झाले, याचा तपशील तक्रार मिळाल्यानंतर स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *