Satara Army Jawan Pramod Jadhav Accident Death | नियतीचा क्रूर खेळ!: पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू; नवजात चिमुकलीने घेतले वडिलांचे अंत्यदर्शन – Kolhapur News



भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद-श्रीनगर येथे कर्तव्य बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर गावी आले असताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या स्वागतासाठी

.

काळाचा अत्यंत क्रूर खेळ या घटनेतून समोर आला असून, आईच्या पश्चात पत्नीच्या बाळंतपणासाठी आठ दिवसांपूर्वीच सुट्टीवर आलेल्या जवान प्रमोद जाधव यांचा वाढे फाट्याजवळ आयशर टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. एकीकडे आज सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी दरे येथे आणले जात असतानाच, दुसरीकडे त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. घरात नव्या जीवाच्या आगमनाचा आनंद साजरा होण्याऐवजी कुटुंबाचा आधारवड गेल्याने, पित्याचा मृत्यू आणि मुलीचा जन्म अशा हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

वीर जवान प्रमोद जाधव यांच्या अंत्यसंस्कारावेळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग पाहायला मिळाला. अवघ्या काही तासांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीला जेव्हा आपल्या वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले, तेव्हा उपस्थित जनसमुदायाचे डोळे पाणावले. शासकीय इतमामात आणि ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांमध्ये या देशपुत्राला साश्रू नयनांनी अखेरची मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा पाहण्यापूर्वीच काळाने हिरावून नेलेल्या या पित्याच्या अकाली निधनामुळे आणि नियतीच्या या क्रूर खेळामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *