Nitesh Rane Residence Suspicious Bag Police Alert | मंत्री नितेश राणेंच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग: ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, घातपाताच्या संशयाने खळबळ! – Mumbai News
![]()
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगेमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, मंत्
.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संशयास्पद बॅगेची सध्या तज्ज्ञ पथकांकडून कसून तपासणी केली जात असून, यात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात ‘प्लीज टेक फ्री शूज अँड क्लोथ्स’ असे लिहिल्याचे आढळून आले.
या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस सर्व तांत्रिक बाबींची कसून चौकशी करत आहेत.
आमदार नितेश राणे यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आणि त्यांना लाभलेली कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहता, त्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे संशयास्पद वस्तू मिळणे ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे. उच्च सुरक्षा क्षेत्रात घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेतील त्रुटींबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पोलिसांच्या सखोल तपासात नेमकी काय माहिती समोर येते आणि यामागे कोणाचा उद्देश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
