![]()
मुक्ताईनगर येथील तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बालवाडी व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांनी पालक व श्रोत्यांची मने जिंकली. विविध रंगीबेरंगी वेशभूषेत
.
अध्यक्षस्थानी आमदार एकनाथ खडसे, व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, संचालक चंद्रशेखर बढे, रमेश खाचणे, शाळा समिती अध्यक्ष पुरुषोत्तम महाजन, महेश पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीलाल जोगी, मुख्याध्यापिका चित्रा भारंबे उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धेतील विजेते, शासकीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका चित्रा भारंबे यांनी केले. बक्षीस वाचन आशा कोळी, सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले. शिक्षक शाळेत राबवत असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. प्राथमिक शाळा ही आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आठवण असते, असे आमदार खडसे यांनी सांगितले. शाळेचा माजी विद्यार्थी हितेश पोतदार यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणून निवड होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतो : आमदार खडसे
