कुंडलवाडी (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कुंडलवाडी पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्डयावर छापा टाकला आहे. मौजे हुनगूंदा शेतिशवार येथील एका आखाड्यावर सुरू असलेल्या तिर्रट नावाच्या जुगारावर ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे धाड १० जुलै २०२६ रोजी कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून हुनगुंदा शेतिशवार येथील आखाड्यावर जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष या ठिकाणी छापा टाकला.
१२ आरोपींवर कारवाई आणि मुद्देमाल जप्त या कारवाई दरम्यान घटनास्थळावरून एकूण १२ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ८१/२०२६, कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- रोख रक्कम: १२,८४० रुपये.
- मोबाईल फोन: अंदाजे ४५,००० रुपये किमतीचे ०६ अँड्रॉईड मोबाईल.
- इतर साहित्य: तिरट जुगाराचे प पत्ते आणि इतर साहित्य. असा एकूण ५७,८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारवाईत सहभाग ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने पार पाडली:
- सपोनि ज्ञानेश्वर शिंदे
- पोउपनि गजानन कल्याणकर
- पोउपनि गजेंद्र मांजरमकर
- सपोउपनि पाटील
- पोलीस कर्मचारी: गिरी, कल्याणकर,दस्तके आणि बोलमवाड
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा अवैध जुगार, मटका किंवा इतर बेकायदेशीर धंद्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम भविष्यातही अशाच प्रकारे तीव्रतेने सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Post Views: 13
