श्रीजया चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील चौथ्या महिला आमदार बनण्याची संधी
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून आजपर्यंत तीन महिला उमेदवारांना विधानसभेत संधी मिळाली. संयुक्त महाराष्ट्रात अंजनाबाई जयवंतराव पाटील यांना मतदारांनी पाठविले होते. सध्याच्या परिस्थितीत श्रीजया अशोक चव्हाण यांना विधानसभेत पाठविणे ही प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे श्रीजया अशोक चव्हाण ह्या निवडूण आल्या तर त्यांचा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर नांदेड जिल्ह्यातून चौथा क्रमांक असेल.
महिलांना सर्वच क्षेत्रांमध्ये भरपूर जागा दिल्या जात आहेत. तशाच काही जागा राजकारणात सुध्दा दिल्या जात आहेत. तरी पण महिलांची संख्या ही काही खुप जास्त नाही. संयुक्त महाराष्ट्राच्यावेळेस 1957 ते 1962 दरम्यान अंजनाबाई जयवंतराव पाटील वायफनेकर यांना मतदारांनी आमदार म् हणून पाठविले होते. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सर्व प्रथम 1980 मध्ये अर्थात जवळपास 16 वर्षानंतर सुर्यकांता पाटील ह्या हदगाव विधानसभा मतदार संघातून निवडूण आल्या होत्या. त्यांचा विजय महत्वपुर्ण होता कारण तो अत्यंत कमी फरकात निकाल आला होता. त्यावेळेस त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्या होत्या. सन 2004 मध्ये दिवंगत नेते प्रकाश खेडकर यांच्या पत्नी शिवसेना पक्षाकडून नांदेड विधानसभा मतदार संघातून निवडूण आल्या होत्या. त्यानंतर त्यानंतर सन 2014 मध्ये अमित अशोक चव्हाण यांना भोकर मतदार संघाने निवडुण दिले होते.
यंदाच्या 2024 निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीने भोकर विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवार बनविले आहे. मतदारांनी त्यांच्यावतीने कौल दिला तर नांदेड जिल्ह्यातील त्या चौथ्या महिला ठरतील ज्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळणार आहे. सोबतच बहुदा सर्वात कमी वयाच्या त्या उमेदवार आहेत आणि निवडूण आल्या तर त्याचीही नोंद होईल. भोकर मतदार संघ श्रीजया चव्हाण यांचे आजोबा डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून आजपर्यंत त्यांच्या कुटूंबाच्या मागे उभा राहिलेला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये भोकर मतदार संघातील जनता काय निर्णय घेईल हे निकालानंतरच कळेल.