![]()
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत सलग सत्तेत असूनही भाजपला स्थानिक नेतृत्व मांडता आले नाही, त्यामुळे त्यांना मोदी-फडणवीसांचे होर्डिंग लावावे लागत आहेत. हे भाजपच्या अपयशाची कबुली अस
.
प्रभाग क्रमांक १२, गोलंदाज चौक, वडारवाडी, छत्रपती शिवाजी नगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांच्या गरजेनुसार विकासकामे करतात, मात्र गेली चार वर्षे महापालिका निवडणुका न झाल्याने प्रशासकीय राजवटीत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली अवास्तव धोरणे राबवली गेली, असे तिवारी यांनी नमूद केले.
मेट्रोच्या नावाखाली एफएसआयची अमर्याद उधळण झाली, मात्र विकास आराखडा व नगरनियोजनाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. परिणामी पुणे शहर आज वाहतूक कोंडीच्या दुष्टचक्रात अडकले आहे, अशी टीका त्यांनी केली.
वाढत्या नागरीकरणानुसार आवश्यक प्राथमिक शाळा, दवाखाने, बालवाड्या, क्रीडांगणे, उद्याने यांची तीव्र कमतरता असून पर्यावरणाला घातक ठरणारी सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. पुरेसे रस्ते व पायाभूत सुविधा नसतानाही बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शहराच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध व पर्यावरणपूरक विकासासाठी पुणे महापालिकेत काँग्रेस-शिवसेना आघाडीची सत्ता येणे आवश्यक असल्याचे तिवारी यांनी ठामपणे सांगितले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि माजी आमदार दिप्ती चवधरी यांनीही भाषणे केली.
प्रभाग क्रमांक १२ मधील काँग्रेस उमेदवार ऋषीकेश जाधव, प्रियंका पवार, राजश्री अडसुळ व जावेद निलगर यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. फैयाज शेख यांनी केले.
