पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांचे निधन – VastavNEWSLive.com
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सदाशिव पांडूरंग कांबळे हे विष्णुपूरी येथे राहतात. प्राप्त झालेल्याा माहितीनुसार त्यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असतांना त्यांचा मृत्यू झाला असल्याची घोषणा वैद्यकीय सुत्रांनी दिली.
सदाशिव कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी,तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Post Views: 55