![]()
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील हिंदू स्मशानभूमी, बौद्ध धर्म दफनभूमी आणि मुस्लिम समुदायाच्या कब्रस्तानची (दफनभूमी) अत्यंत दुरवस्था झाली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, या गंभीर मुद्द्यावर सर्व नगरसेवक एकत्र आले आहेत. त्यां
.
या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण, वाढलेली झाडेझुडपे, तण आणि कचरा साचला आहे. यामुळे परिसराचे पावित्र्य भंग पावले असून, मृतांसाठी अंतिम विश्रांती स्थळ असलेल्या या जागांची देखभाल करणे आवश्यक आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशभरात स्वच्छतेवर भर दिला जात असताना, नांदगाव खंडेश्वरमधील या जागांची दुरवस्था चिंताजनक आहे.
नगरसेवकांनी प्रशासनाला वाढलेले गवत, झाडेझुडपे छाटून कचरा काढण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. पावसाळा आणि उन्हाळ्यात येथे कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरते. रात्रीच्या वेळी या भागात पुरेसा प्रकाश नसतो आणि नियमित स्वच्छताही ठेवली जात नाही.
हिंदू स्मशानभूमी परिसरातील रस्त्यालगतचे पथदिवे बंद आहेत, तसेच वाढलेली झाडे धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. चांदूर रेल्वे रोड ते आठवडी बाजार मार्ग आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अंधारात असल्याने नागरिकांना रात्री अडचणींचा सामना करावा लागतो. पथदिव्यांअभावी अपघाताची शक्यता वाढली असून, असामाजिक तत्वांचा वावरही वाढला आहे.
अस्वच्छतेच्या चर्चेदरम्यान, बेग नाल्याजवळील कचऱ्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घनकचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची भीती आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि शाळकरी मुलांनाही याचा त्रास होत आहे.
स्मशानभूमी आणि कब्रस्तानचे सुशोभीकरण तसेच इतर सुविधांसाठी सर्व नगरसेवक तयार असल्याचे नगरसेविका प्रांजली गुल्हाने आणि छकुली गेडाम यांनी स्पष्ट केले. यासाठी प्रत्येक नगरसेवकांच्या वाट्याला येणारा निधी देण्याचीही त्यांची तयारी आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनही देण्यात आले आहे.
