Water from ‘Girja’ will come to the Wakod project by June, solution to water shortage in 14 villages, relief for many villages including Viramgaon, Mahalakinhola, Vadodbazar, Aland | ‘गिरजा’चे पाणी जूनपर्यंत वाकोद प्रकल्पात येणार: 14 गावांतील पाणी टंचाईवर तोडगा, विरमगाव, महालकिन्होळा, वडोदबाजार, आळंदसह अनेक गावांना दिलासा‎ – Chhatrapati Sambhajinagar News



तालुक्यातील मुख्य नदी असलेल्या गिरजा नदीतील पाणी वाकोद प्रकल्पात लवकरच येणार आहे. यासाठी टाकण्यात येणाऱ्या भूमिगत पाइपलाइनचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या नदीजोड कालव्याचे काम चालू असून यंदा जून महिन्यापर्यंत गिरजा नदीचे पाणी वा

.

फुलंब्री तालुक्यात ३ मध्यम प्रकल्प आहेत. यातील वाकोद प्रकल्प हा सर्वात मोठा असून या प्रकल्पाला पाणी साठवण्यासाठी फारसा सोर्स नसल्याने सर्वात मोठा प्रकल्प असूनही मोठ्या प्रमाणात पाणी पडल्यानंतरही हा प्रकल्प भरत नव्हता. या प्रकल्पात पाणी कसे पाठवायचे म्हणून गिरिजा नदीचे पाणी वळवणे हा एकच मार्ग होता. त्यामुळे राज्य शासनाकडे गिरिजा वाकोद नदीजोड कालव्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली होती, परंतु निधीची तरतूद केली नव्हती. यासाठी तत्कालीन आमदार व सध्याचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेत या प्रकल्पासाठी जवळपास २७५ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी आमदार अनुराधा चव्हाण यांनी पुढे पाठपुरावा चालू ठेवला आहे. तालुक्यातील पिंपळगाव वळण येथून गिरिजा नदीपात्रात पाणी अडवून ते भूमिगत चार फूट रुंदीच्या असलेल्या दोन पाइपलाइनच्या माध्यमातून वाकोद मध्यम प्रकल्पात सोडले जाणार असल्याने जमीन संपादन करण्याची गरज नसून शेतकऱ्यांच्या जमिनीही या प्रकल्पात पाणी नेण्यासाठी गेल्या नसून, जाणारही नाहीत.

सध्या पिंपळगाव वळण ते वाकोद प्रकल्पापर्यंत पाइपलाइन पूर्ण झाली आहे, तर पिंपळगाव वळण येथील पाणी अडवण्याचे काम अद्यापही बाकी आहे. भूमिगत पाइपलाइन बरोबर गिरिजा नदीचे पाणी अडवण्याचे काम चालू केले असते तर मागील वर्षीच गिरिजा म्हणजे पाणी वाकोद प्रकल्पात आले असते.

पाणी वाहून जाणार नाही, ते प्रकल्पात येईल ^ गिरिजा नदीचे वाहून जाणारे पाणी वाकोद प्रकल्पात सोडण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनाने पुढील नियोजन चालू आहे. तालुक्यातील सर्वात जास्त मोठा हा वाकोद प्रकल्प आहे. या प्रकल्पास पाण्याचा सोर्स नसल्याने हा प्रकल्प नेहमी कोरडा राहतो. नदीजोड कालव्याचे नियोजन करण्यात आले आहे. – धीरज पाटेकर, कनिष्ठ अभियंता

मराठवाड्यात वेगळी ओळख होईल निर्माण ^हा खूप मोठा प्रकल्प आहे. याचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी मी स्वतः लक्ष घालून आहे. या प्रकल्पामुळे फुलंब्रीची मराठवाड्यात वेगळी ओळख होणार आहे, तर शेतकऱ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पावसाळ्यात गिरिजा नदीचे वाहून जाणारे पाणी वाकोद प्रकल्पात नक्की येणार. -अनुराधा चव्हाण, आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *