![]()
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे मानपाडा, कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. असे असतानाच, य
.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समजाविषयी आक्षेपार्ह विधान करत अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचे ऐकू येत आहे. (दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.) मीनाक्षी शिंदे यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे आगरी समाजात नाराजीचा सूर उमटला असून याचा जाहीर निषेध केला जात आहे.
मीनाक्षी शिंदे यांच्या ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यासोबत एक संदेशही लिहिण्यात आला आहे. पायाखालची जमीन खचली आहे म्हणून धमक्यांची भाषा केली जात आहे. मात्र नागरिक या धमक्यांना भीक घालणार नाही. तसेच ठाण्याच्या प्रथम नागरिकपदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता क्रांतीची मशाल पेटणार असून जनता ही हुकुमशाही मोडून काढेल, असेही म्हटले आहे.
नेमका वाद काय?
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर हा परिसर येतो. याच प्रभागातून माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे निवडून येतात. परंतु, याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर गेल्यावर्षी निवडून आले. यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यात मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. यामुळे पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले होते. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनीही राजीनामा दिला होता. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाने भूषण भोईर यांची उमेदवारी रद्द करत वायचळ यांना उमेदवारी दिली. याच कारणांमुळे आता भूषण भोईर यांनी बंडखोरी केली आहे.
