दबंग पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची उल्लेखनीय कामगिरी; ९ चोरीचे गुन्हे उघडकीस

नांदेड :
दबंग पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेने चार महिला चोरट्यांना अटक करून नांदेड जिल्ह्यातील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत आरोपींकडून ११.०७ तोळे सोन्याचे व १६ तोळे चांदीचे दागिने, असा ५ लाख ६८ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नुतन सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, तसेच पोलीस अंमलदार शीतल सोळंके, सुनील गटलेवार, माधव माने, संघरत्न गायकवाड, शेख उमर, महेश बडगु, श्रीराम दासरे व सुधाकर देवकत्ते यांच्या पथकाने इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर परिसरातून तीन महिला व एका तृतीयपंथीयास अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पूनम आतिश हातवळणे (२९), राखी हिरा हातवळणे (४०), शन्नू राजू हातवळणे (५०) व महेश दिनाजी गायकवाड अशी आहेत.
तपासादरम्यान आरोपींकडून मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३, बिलोलीतील २ तसेच अर्धापूर, कंधार व लोहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी १, असे एकूण ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपी बस प्रवासादरम्यान महिला प्रवासी बसमध्ये चढताना किंवा उतरताना गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरण्याच्या घटना करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे बस प्रवासादरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *