Shivsena Shinde Ajit Pawar NCP Alliance Announced in Nashik | Nashik Mahayuti Splits | Narhari Zirwal | Nashik Corporation Election | नाशिकमध्येही महायुतीचे फिस्कटले: शिंदे-अजित पवार गट एकत्र महापालिका निवडणूक लढवणार; नरहरी झिरवाळ यांची घोषणा – Nashik News



नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. मागील २-३ दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे अखेर महायुतीत फूट पडली असून, सोमवारी (२९ डिसेंबर) राज्

.

नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची इच्छा होती, परंतु भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे आता आम्हाला स्वतंत्र विचार करावा लागत आहे. आपल्याला महायुतीत लढायचे ठरवले होते. त्यामुळे आमच्यात जागांचा विषय आलेला नव्हता. परंतु, आता आमची (शिंदे गट आणि राष्ट्रवादी) चर्चा सुरू झाली असून, आज रात्रभरात पूर्ण जागांबाबत विचार करून, सामंजस्याने प्रश्न सोडवू आणि निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारला असता, आमच्यात मेरिटनुसार जागावाटप होणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. ज्याला इलेक्टीव मेरिट असेल, अशांना उमेदवारी देणार आहोत. तसेच आमच्यासोबत वंचितला तसेच आनंद आंबेडकर यांच्या गटाला घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

‘मविआ’ची वज्रमुठ, मनसेचीही एन्ट्री

एकीकडे महायुतीत बिघाडी झाली असताना, महाविकास आघाडीने मात्र कमालीची एकजूट दाखवली आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये मनसे देखील महाविकास आघाडीच्या सोबतीने निवडणूक लढवणार आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना या आघाडीत ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत असेल. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या कोट्यातून मनसेला जागा दिल्या जाणार आहेत.

अद्याप १० ते १२ जागांवर चर्चा सुरू असून आज रात्रीपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल. भाजपला रोखण्यासाठी मतांचे विभाजन टाळणे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनील भुसारा यांनी सांगितले.

भाजपपुढील आव्हाने

भाजपने ‘स्वबळा’ची घोषणा केली असली तरी, त्यांच्याच आमदारांमध्ये ‘आयारामां’मुळे मोठी नाराजी आहे. बाहेरील नेत्यांना पायघड्या घातल्या जात असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. यामुळे भाजपला आता केवळ विरोधकांशीच नाही, तर अंतर्गत बंडाळीशीही लढावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *