![]()
शहरातील हडको परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिल्याची घटना गुरुवारी (१ जानेवारी) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी संशयित व्यक
.
व्हिडिओ व्हायरल, तक्रारीची प्रतीक्षा
रमेश इधाटे यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो शहरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असली तरी या प्रकरणी अद्याप कोणीही अधिकृत तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाही. तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सिडको पोलिसांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. दरम्यान घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
नशेच्या धुंदीत जवानाचा एमजीएमसमोर गोंधळ
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात तैनात असलेल्या कडक पोलिस बंदोबस्तात ३१ डिसेंबरच्या रात्री एका मद्यधुंद लष्करी जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एमजीएम हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूच्या नशेत बेदरकारपणे दुचाकी चालवून गोंधळ घातला. या प्रकरणी जवानावर गुन्हा दाखल केला आहे.
जिन्सी ठाण्याचे पोलिस हवालदार नरेंद्र दीक्षित आणि त्यांचे सहकारी ३१ डिसेंबरच्या रात्री डायल ११२ वर गस्त घालत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास एक जण पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हावर जोराने ओरडत, निष्काळजीपणे गाडी चालवताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवले असता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या मदतीने संबंधिताला ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी त्याने मद्यसेवन केल्याचा अभिप्राय दिला. चौकशीत तो विजय शेषराव बर्डे (५०, रा. आदर्शनगर, जाफराबाद, जि. जालना) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो भारतीय लष्कराचा जवान आहे. पोलिसांनी मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
