![]()
जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी एक अभिनव संकल्पना सुरू केली आहे. यानुसार, दर महिन्याला तीन उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोटो ‘वॉल ऑफ फेम’वर प
.
या उपक्रमासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करताना काही निकष ठरवण्यात आले आहेत. यात सामान्य नागरिक आणि कार्यालयप्रमुखांनी सोपवलेली कामे वेळेत पूर्ण करणे, कार्यालयीन व्यवहार स्वच्छ व पारदर्शक ठेवणे आणि सेवा नियमांनुसार इतर जबाबदाऱ्या पार पाडणे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबवले जातात, ज्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. त्यांच्या या प्रयत्नांचा गौरव करणे हा यामागील उद्देश आहे.
सीईओ संजीता महापात्र यांच्या मते, या उपक्रमामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि कार्यालयीन कार्यक्षमतेत वाढ होईल. ‘नव्या वर्षात नवे काही’ या संकल्पनेनुसार, हा उपक्रम जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. ‘बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ’ म्हणून निवड झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे छायाचित्र ‘वॉल ऑफ फेम’वर प्रसिद्ध केले जाईल. यासाठी दर महिन्याला वेगवेगळ्या विभागांतील तीन कर्मचाऱ्यांची निवड केली जाईल.
या निवडीसाठी एक विशिष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीला, संबंधित खातेप्रमुख त्यांच्या विभागातून प्रत्येकी तीन नावांची शिफारस करतील. सर्व खातेप्रमुखांकडून प्राप्त झालेल्या नावांचा एकत्रित विचार करून त्यातून अंतिम तीन नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोणताही कर्मचारी स्वतःहूनही आपली माहिती सादर करू शकतो, ज्यासाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, जर एखाद्या कार्यालयाच्या उपक्रमाला किंवा कामाला राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला असेल, तर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याचे त्या कार्यक्रमातील छायाचित्र ‘वॉल ऑफ फेम’वर प्रकाशित करून त्यांचा विशेष सन्मान केला जाईल.
या उपक्रमाबाबत बोलताना सीईओ संजीता महापात्र म्हणाल्या, “विहित कालावधीत उद्दिष्टपूर्ती करणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असले तरी, असे उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव करणे आवश्यक आहे. यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन प्रेरणा मिळते. म्हणूनच, प्रत्येक महिन्यात उत्कृष्ट कार्य आणि उद्दिष्टपूर्ती करणाऱ्यांची ‘बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ’ म्हणून निवड करून त्यांचा योग्य सन्मान केला जाईल आणि त्यांची छायाचित्रे ‘वॉल ऑफ फेम’वर प्रकाशित केली जातील.”
