MNS Snehal Jadhav Resigns Ticket Denial Thackeray Alliance | Raj Thackeray | Uddhav Thackeray | MNS Shivsena UBT Alliance | BMC Elections | निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत राज ठाकरेंना धक्का: सरचिटणीस स्नेहल जाधव यांचा राजीनामा, वॉर्ड 192 मधील उमेदवारीवरून संताप – Mumbai News



मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसे यांच्यात ऐतिहासिक युती झाली असली, तरी या युतीमुळे कार्यकर्त्यांमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. मनसेच्या ज्येष्ठ नेत्या आणि पक्षाच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी आपल्या सर्व पदांसह प्राथ

.

स्नेहल जाधव या मुंबईतील मनसेचा एक प्रबळ चेहरा मानल्या जातात. वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी जाहीर करताना पक्षाने त्यांना अंधारात ठेवल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, स्नेहल जाधव यांनी १९९२ ते २००७ असे सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर त्यांचे पतीही याच वॉर्डमधून निवडून आले होते. सलग अनेक वर्षे या प्रभागावर पकड असतानाही ऐन निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने आणि साधी चर्चाही न केल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

मनसेला धक्क्यावर धक्के

गेल्या काही दिवसांपासून मनसेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता मुंबईतील ज्येष्ठ नेत्या स्नेहल जाधव यांच्या राजीनाम्याने मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेत उत्साहाचे वातावरण असेल असे वाटत असतानाच, या एकामागून एक बसणाऱ्या धक्क्यांमुळे पक्षाची चिंता वाढली आहे.

युती आणि आघाड्यांमुळे इच्छुकांची कोंडी

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर युती आणि आघाड्यांचे राजकारण सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यामुळे अनेक प्रभागांत जागावाटपाचे गणित जुळवताना जुन्या आणि दिग्गज नेत्यांची तिकिटे कापली जात आहेत. वॉर्ड 192 मध्येही युतीचा उमेदवार ठरवताना स्नेहल जाधव यांना डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे. ही केवळ एका पक्षाची समस्या नसून, सर्वच राजकीय पक्षांमध्ये ‘इच्छुकां’चे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा…

तिकिटासाठी कुठे अश्रू तर कुठे दंडवत!:जळगावात महिला इच्छुकाचा टाहो, पुण्यात भाजप नेत्याने मंत्र्यांच्या पायावर ठेवले डोके

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून, जळगाव आणि पुणे या दोन शहरांतून उमेदवारीवरून दोन वेगवेगळी चित्रे समोर आली आहेत. जळगावमध्ये तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्तीला रडू कोसळले, तर पुण्यात भाजप नेत्याने उमेदवारी मिळाल्यावर चक्क मंत्र्यांच्या चरणी लोटांगण घातले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *