सोयगावला हस्तांतरणापूर्वीच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे प्लास्टर कोसळले:डागडुजीनंतरही परिस्थिती गंभीर, बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत चौकशीची मागणी‎

[ads1]


येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी ७ कोटी ५१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असताना, ही इमारत शासनाकडे हस्तांतरित होण्यापूर्वीच तिला मोठे तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इमारतीच्या छताचे प्लास्टरही कोसळले असून, खिडक्यांजवळ तसेच आतील व बाहेरील भिंतींवर भेगा पडल्या आहेत. खर्च करून उभारण्यात आलेल्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल संताप व्यक्त होत आहे. सोयगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या शासकीय विश्रामगृहाची जागा पाडून तेथे ही भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील एका कन्स्ट्रक्शन या फर्मला करारनामा क्रमांक ब-१/११६३ अन्वये १० मार्च २०२३ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. ९ मार्च २०२५ ही काम पूर्ण करण्याची २४ महिन्यांची मुदत होती. हे संपूर्ण बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फर्दापूर उपविभागाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आले. बांधकामाच्या सुरुवातीपासूनच निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. वाळूऐवजी खडीचा बारीक फफुटा वापरल्याने इमारतीला तडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. तीन महिन्यांपूर्वीच इमारतीला तडे गेल्यानंतर ठेकेदाराने त्यावर वरवरची डागडुजी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पुन्हा छताचे सीलिंग आणि प्लास्टर कोसळल्याने धोका वाढला आहे. तांत्रिक तपासणी करण्याची होतेय मागणी हस्तांतरणापूर्वीच ही बिकट अवस्था झाल्याने शासकीय निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या संपूर्ण बांधकामाची उच्चस्तरीय तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बांधकामाच्या सुरुवातीपासूनच निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. कार्यवाही करण्यासाठी सूचना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला पडलेले तडे आणि छताचे कोसळलेले प्लास्टर याची दखल घेण्यात आली आहे. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. – ब्रह्मानंद तायडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, फर्दापूर

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *