![]()
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव पेठ येथील माजी विद्यार्थी संघाची पहिली बैठक शाळेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. या बैठकीत गावाती
.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नितीन हटवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला सचिव तथा प्राचार्य देवेंद्र ठाकरे, अरुण राऊत, तिरमनदास कापडे, दिनकर सुंदरकर, प्रा. मोरेश्वर इंगळे, मंगेश तायडे, दिलीप चौधरी, मनोज मोरे, विजय कापडे, नीरज दारोकार, उद्धव पांढरीकर, किशोर राऊत, विनोद गभने, सुनील धर्माळे, निलेश सरोदे, अतुल राऊत आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाने स्थापनेच्या दिवशी शाळेच्या विकास कामांचा तसेच स्वातंत्र्यसंग्राम सेनानी वीर केसरीसिंह रघुवंशी यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा हाती घेतला होता. नितीन हटवार यांनी घेतलेल्या पुढाकाराने तसेच संकल्पनेनुसार दीर्घकाळानंतर जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील स्वतंत्र संग्राम सेनानी वीर केसरीसिंह रघुवंशी यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी यांनी निधी उपलब्ध करून दिला. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून हे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या यशस्वी उपक्रमासाठी अध्यक्ष नितीन हटवार व माजी विद्यार्थी संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.
