![]()
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ही मतदानाची तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सोलापुरात भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला असून, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांन
.
निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्ती आज निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहेत, याचे नवल वाटते. भाजपमध्ये उमेदवाराची आर्थिक क्षमता किंवा तो किती खर्च करणार, हे विचारण्याची पद्धत कधीच नव्हती. मात्र, सध्या मुलाखतींमध्ये याच मुद्द्यांवर भर दिला जात आहे. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या वर्चस्वामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
दुसरीकडे, आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्थानिक निवडणूक समिती आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक समितीत कोण आहे, हे मला माहित नाही. जागांच्या वाटाघाटी केवळ पालकमंत्री करत आहेत. कोणाशी चर्चा करायची हेच स्पष्ट नसल्याने आम्ही प्रक्रियेपासून दूर आहोत, असे सांगत त्यांनी स्थानिक नेतृत्वातील दरी स्पष्ट केली.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम
दोन्ही आमदारांनी स्पष्ट केले आहे की, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. भाजपमधील या दोन बड्या नेत्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जर निष्ठावंतांनी बंडाचे निशाण फडकवले, तर सोलापूर महापालिकेत भाजपला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
