कंधार(प्रतिनिधी)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान २०२६ अंतर्गत बस स्थानकाचे चौथे सर्वेक्षण समिती मार्फत दि.२८ मार्च रोजी येथील बसस्थानकाचे सर्वेक्षण करण्यात आले. बस स्थानकात असणाऱ्या सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहणी करण्यात आली. यावेळी धाराशिव विभागाचे विभाग नियंत्रक अजय पाटील, कामगार अधिकारी प्रदिप सुतार, सर्वेक्षण समिती पत्रकार मुरलीधर थोटे, प्रवासी मित्र बालाजी गुंडाळे या चार सदस्यीय समिती मार्फत बसस्थानक इमारत व परिसराची पाहणी सर्वेक्षण करून मूल्यांकन करण्यात आले.
यावेळी स्थानक प्रमुख अनिल पळनाटे, ईश्वर गोरे, आर.व्ही.कदम, एम. के. मुस्तापूरे,जी.डी. पांचाळ पी. जी. काळे, शिवराज बोधगिरे, कदम,शिवाजी तोटवाड, भगवान चव्हाण, आर. बी.कल्याणकस्तुरे,डी.पी.मंगनाळे, बि.जी. मैस्सना, एन.डी. ठाकूर, एम.डी.केंद्रे,रमेश आडकुटे, नामदेव धोंडगे, एफ. एन.शेख, जि.डी.शिंदे,ए.डी.केंद्रे,ए.बी.गित्तेसह कर्मचारी व प्रवाशी उपस्थीत होते.
परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सन २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियान स्पर्धात्मक स्वरुपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रादेशिक स्तरावर अ, ब आणि क वर्ग बस स्थानक अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय १० ते १ लाख रुपये फिरता चषक व प्रशस्तीपत्र, वर्ग बस स्थानक अनुक्रमे चषक व प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक मिळणार असून सदरील सर्वेक्षण समितीने कंधार आगारातील स्वच्छ, सुंदर बसस्थानक हे अभियान अहवाल दिला आहे.
