Ayushman Bharat Scheme 1356 Diseases Eligibility Documents Card Process | ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत 1356 गंभीर आजारांवर मोफत उपचार: पात्रता, कागदपत्रे आणि कार्ड कसे काढायचे? जाणून घ्या सर्वकाही


4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आयुष्मान भारत योजनेचे महाराष्ट्रातील स्वरूप अतिशय व्यापक आहे. महाराष्ट्रात ही योजना ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)’ आणि राज्य सरकारची ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या एकत्रीकरणातून राबवली जाते. राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांसाठी मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून उपचारांचा आर्थिक भार सामान्य कुटुंबावर पडणार नाही. या एकत्रित योजनेअंतर्गत आता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. उपचारांची संख्या यात साधारणपणे १३५६ हून अधिक उपचारांचा/शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

महत्त्वाची गोष्ट : कोणाला लाभ मिळतो? (पात्रता)

महाराष्ट्र सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून ती ‘सार्वत्रिक’ केली आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक. पांढरे रेशन कार्ड असलेले नागरिक (उत्पन्नाची मर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे). नोंदणीकृत बांधकाम कामगार, सरकारी कर्मचारी आणि पत्रकार.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

आयुष्मान कार्ड हे सर्वात महत्त्वाचे आहे. आधार कार्ड. रेशन कार्ड असावे लागते. सर्व सरकारी रुग्णालये. योजनेच्या पॅनेलवर असलेली खासगी मोठी रुग्णालये. “महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना” किंवा “आयुष्मान भारत” असा बोर्ड लावलेल्या रुग्णालयात उपचार.

असे तयार करा आपले स्वत:चे आयुष्मान कार्ड

जर तुमच्याकडे ‘आयुष्मान कार्ड’ नसेल, तर तुम्ही खालील मार्गांनी ते काढू शकता प्ले स्टोअरवरून आयुष्मान ॲप डाऊनलोड करून नोंदणी आणि ई-केवायसी करू शकता. जवळपासचे ‘आपले सरकार’ सेवा केंद्र येथे जाऊन रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवून तुम्ही नोंदणी करू शकता.

स्रोत : अधिकृत संकेतस्थळाद्वारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *