Diwali Lantern

साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई:वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड




सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30 लाख 60 हजार 520 किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे (वय 60) व प्रतिक दिलीप काळे (वय 34, दोघे रा. विठ्ठलनगर, वडूज जि. सातारा ) यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे १ जुलैच्या रात्री पेडगाव रोड ते काळेमळा परिसरातील पृथ्वी प्लॅनेट गृहप्रकल्पाशेजारील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान १,९८९ गोण्यांमध्ये सुमारे ९९,४५० किलो बनावट दाणेदार खत आढळून आले. या साठ्याची किंमत ₹26.85 लाख इतकी आहे. कारवाईत नामांकित कंपन्यांच्या DAP व 10:26:26 खतांच्या बनावट छपाईच्या रिकाम्या गोण्या, लेबल्स, तसेच क्लोरोपायरीफॉस, झिंक फॉस्फाइड व बोरिक अॅसिड या बनावट कीटकनाशकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय गोण्या शिवण्याचे मशीन व पाऊच फिलिंग मशीनही हस्तगत करण्यात आले. आरोपींकडे बनावट खत व कीटकनाशके कोठून आणली आणि नामांकित कंपन्यांच्या गोण्या कोठे छापून घेतल्या, याबाबत समाधानकारक माहिती नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी अक्षय प्रताप सावंत यांच्या फिर्यादीवरून रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, कीटकनाशक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथक, सातारा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा व दहिवडी विभागाच्या पोलिसांनी संयुक्तपणे केली. जप्त नमुने रासायनिक विश्लेषणासाठी कोल्हापूर व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणधीर कर्चे करत आहेत. हे ही वाचा… स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा:जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात सातारकरांच्या जनआक्रोश मोर्चाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सातारा जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात विविध संघटना, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳