Thackeray brothers’ alliance to be announced soon | ठाकरे बंधुंच्या युतीची लवकरच होणार घोषणा: संजय राऊतांचे विधान, धनुष्यबाण बाजुला ठेवून निवडणुका लढण्याचे शिंदेंना आव्हान – Mumbai News



राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आणि मनोमिलन झालेले आहे. आता राजकीय युतीविषयी म्हणाल, तर मुंबईस, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे याठिकाणच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या संपलेल्या आहेत. शेवटपर्यंत या मोठ्या महानगरपालिकांच्

.

संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदर यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये जागावाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या असून, आज दिवसभरात या यादीवर शेवटचा हात फिरवला जाईल. “फक्त मुंबईच नाही, तर राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. या प्रितीसंगमात महाराष्ट्रातील जनता नक्कीच सहभागी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरपालिका निकाल म्हणजे नाटक

नुकत्याच लागलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालांवर भाष्य करताना राऊत यांनी महायुतीवर कडाडून टीका केली. या निकालांना त्यांनी ‘एक नाटक’ संबोधले. “ज्या पद्धतीने एखाद्या नाटकाची तिकिटे विकली जात नाहीत, तेव्हा मालक स्वतःच तिकिटे विकत घेतो आणि रिकाम्या थिएटरसमोर नाटक करून ‘शो हाऊसफुल्ल’ असल्याचे दाखवतो, तसेच कालच्या निकालांचे आहे. सत्तेचा वापर करून आणि प्रचंड पैसे खर्च करून कालचा विजय मिळवला गेला आहे. हा जनतेचा कौल नसून विकत घेतलेला निकाल आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

निवडणूक आयोगावर ताशेरे

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी केलेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी कोट्यवधी रुपये कोणी खर्च केले होते? हेलिकॉप्टर, चार्टर्ड प्लेन घेऊन नगरपालिकांच्या प्रचाराला कोण गेले? आम्ही तरी असे पाहिले नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, पण या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या तीन गटांतच जुंपली होती. या तिघांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पैशांची उधळपट्टी केली. कोट्यवधी रुपये आले कुठून? कसे आले? वाटले गेले, पकडले गेले. निवडणूक आयोगाने काय केले? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचे समर्थन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात ते १०० टक्के खरे आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षास जिंकण्यास मदत केली. याच चुकीचे काही नाही. आमचे कार्यकर्ते लढले. आमचे नेते गेले नाही. कारण आम्ही वर्षानुवर्षे ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडली.

असली-नकलीचा फैसला चिन्हाशिवाय करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘असली शिवसेना’ कोण, यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी थेट आव्हान दिले. “नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून असली कोण? नकली कोण? असे शिंदे म्हणत असतील, तर आमचे चोरलेले चिन्ह बाजुला ठेवा. अमित शहांनी दरोडा टाकून आमचे चोरलेले चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण? नकली कोण‌? याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष आणि चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहात, हे लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंनी घराघरात पोहोचवलेला धनुष्यबाण चोरून तुम्ही निवडणूक लढत आहात. तो एका निवडणुकीसाठी बाजूला ठेवा,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *