![]()
आरोग्य शिक्षण आणि संशोधनामध्ये नवीन अध्याय सुरू करण्याच्या उद्देशाने, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ आणि अपोलो एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड, चेन्नई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे एम
.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., अपोलो एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसचे सीबीओ आशिष शर्मा, प्र-कुलगुरू मोहित दुबे (संशोधन आणि उद्योजकता), प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी (तंत्रज्ञान विभाग), कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘अ’ श्रेणीचे नॅक (NAAC) मानांकन मिळाल्यानंतर, आता तंत्रज्ञान शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर प्रगती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या करारामुळे विद्यापीठासाठी आरोग्य शिक्षण आणि संशोधनाची नवीन दारे उघडली गेली आहेत, असे प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याची आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळवण्याची संधी मिळेल. तसेच, ‘अलाईड हेल्थ’ (संलग्न आरोग्य विज्ञान) क्षेत्रातील व्यावसायिकांची असलेली मोठी कमतरता भरून काढण्यासही यातून मदत होईल.
कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले की, या उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.
यावेळी बोलताना, अपोलोचे सीबीओ आशिष शर्मा यांनी अपोलो समूहाबद्दल माहिती दिली. अपोलो समूह आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असून, अपोलो एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसद्वारे आरोग्य क्षेत्रातील जागतिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाशी (NEP) सुसंगत आहेत.
या भागीदारीतून आरोग्य विज्ञानातील पदवी (B.Sc), पदव्युत्तर (M.Sc) आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध होतील. अपोलोकडे असलेल्या गेल्या ४० वर्षांच्या आरोग्य क्षेत्रातील डेटा आणि सिम्युलेशन कोर्सेसचा फायदा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी घेता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
