राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात: कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी जात असताना कारने दिली धडक, मणक्याला दुखापत – Maharashtra News

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अमरावती शहरात भीषण अपघात झाला आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी दुचाकीवरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात आमदार खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला ग

.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि बैठकांचे सत्र सुरू आहे. आज आमदार संजय खोडके हेदेखील अशाच एका कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी स्वतः दुचाकी चालवत जात होते. शहरातील एका चौकातून जात असताना वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आमदार खोडके दुचाकीवरून उडून थेट रस्त्यावर पडले.

अपघातानंतर तातडीने परिसरातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी धाव घेत त्यांना उपचारासाठी अमरावतीतील रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातात संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला दुखापत झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *