Shiv Sena BJP Alliance Seat Distribution Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरममध्ये महायुतीचे 50% जागांवर एकमत: उर्वरित जागांवर चर्चा सुरू; 22 तारखेपूर्वी तोडगा काढण्याचे प्रयत्न – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या बैठकांमध्ये अद्याप पूर्ण तोडगा निघालेला नाही. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, आतापर्यंत केवळ 50 टक्के जागांवर काही प्रमाणात एकमत झाले आहे. उ

.

शहरात युतीची ही तिसरी बैठक पार पडली. यावेळी भाजपच्या वतीने ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, खासदार डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर उपस्थित होते. शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती.

संजय शिरसाट यांनी सांगितले की, 50 टक्के जागांवर बोलणी पूर्ण झाली असली तरी, इतर प्रभागांमध्ये चर्चा सुरू आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार ताकदवर आहेत, यावर सखोल विचारमंथन केले जात आहे. काही ठिकाणी भाजपचे, तर काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार मजबूत असल्याने या जागांवर निर्णय घेण्यास वेळ लागत आहे. 22 तारखेपूर्वी यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले.

ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, युतीमधील चर्चा सकारात्मक झाली आहे आणि लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल. समन्वय समितीतील सर्व सदस्यांनी प्रभागनिहाय स्थितीचा अभ्यास करून ही गणिते मांडली आहेत. युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा…

‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’:विकासाबद्दल बोलायचे झाले की ‘ते’ पळ काढतात; भाजप–एमआयएममध्ये रंगला वादाचा जोरदार सामना VIDEO

दिव्य मराठी ॲपने आयोजित केलेल्या ‘लढाई मनपाची, आवाज नागरिकांचा’ टॉक शोला प्रभाग १९ मध्ये उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘भाजप आणि महायुतीचे लोक विकासाबद्दल बोलायचे झाले की ते पळ काढतात,’ अशी टीका एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर प्रत्युत्तर देताना करत भाजपच्या उमेदवारांनी ‘एमआयएमने सत्तेत असताना कोणते ठोस काम केले,’ असा सवाल केला. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *