गुणवत्तेमुळे बालवयात विमानवारीचे स्वप्न झाले साकार:संजय खारकर

0
240_177736701369f077e5869bc_vimanwari.jpg




प्रतिनिधी | अमरावती
गटसाधन केंद्र, पंचायत समिती चांदूर रेल्वेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा आणि उपक्रमांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुरु-शिष्य सन्मान सोहळा मंगळवारी २८ रोजी गटसाधन केंद्र, चांदूर रेल्वे येथे आयोजित करण्यात आला. गटविकास अधिकारी संजय खारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या संकल्पनेतून गुरु-शिष्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र दिवाण, प्रदीप काळपांडे, किरण पाटील, गटसमन्वयक मंगेश उल्हे, केंद्रसमन्वयक सुभाष सहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाल्याबाबत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा जवळा येथील मुख्याध्यापक शकील अहमद, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सय्यद रज्जाक, स्पोकन इंग्लिश व स्पेल-बीमधील उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरपूर येथील अनुष्का सवाई, महाकविता वाचन उपक्रमासाठी आरुषी देवघरे, श्रीकांत बाभूळकर यांचा सन्मान करण्यात आला. नवोदय परीक्षेतील यशाकरिता जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दहीगाव येथील सतेज करुणाधन, नियती खडसे, गुंजन वानखडे, शिक्षक प्रल्हाद इंगोले, विशाल बेले यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कळमगाव येथील विद्यार्थिनी समृद्धी वासनिक, शिक्षक रितेश जगताप यांचा सन्मान करण्यात आला. बंगलोर विमानवारीकरिता निवड झाल्याबाबत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दिघी कोल्हे येथील विद्यार्थी आयुष वाहने, भीमसेन देवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed