गोमातेला राष्ट्रीय पशू म्हणून दर्जा द्यावा अन् गोमातेचे संरक्षण करावे:कन्नड शहरात गोमाता सन्मान रॅली, तहसीलदारांना निवेदन
![]()
कन्नड शहरात ‘गोमाता सेवा, संरक्षण व सन्मान’ निमित्त सोमवारी (२७ एप्रिल) पिशोर नाका ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालयात तहसीलदार सारिका भगत यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला. ‘गोमाता’चा सन्मान व्हावा, या मागणीसाठी मुरारी पारिक परिवार, हिंदू समाजाच्या वतीने आयोजन झाले. गोमातेला राष्ट्रीय पशू म्हणून दर्जा द्यावा, गोमातेचे संरक्षण करावे या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सारिका भगत यांना देण्यात आले. पिशोर नाका ते तहसील कार्यालय या मार्गावर रॅली शिस्तबद्ध झाली. वातावरण उत्साही राहिले. शहरासह ग्रामीण भागातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान प्रशासनाला गोमाता सेवा, संरक्षण, सन्मान याबाबत निवेदन देण्यात आले. जनजागृती करण्यात आली. भारतीय संस्कृती, परंपरा जपण्याचे आवाहन करण्यात आले. रॅलीचे नेतृत्व महामंडलेश्वर मुक्तानंद महाराज, चैतन्य आनंद बापूजी महाराज, कीर्तिनाथ भाट्या मारुती महाराज, कैलास महाराज, शिवदत्त महाराज राजगुरू, विष्णू महाराज काळे, गणेशानंद महाराज शास्त्री, नवनाथ महाराज सुरपाळा संस्था, दत्ता महाराज कदम, सुरेश महाराज आढाव, ज्ञानेश्वर महाराज, हस्ता, मनीष महाराज झाल्टे, लखन महाराज यांनी केले. उद्योजक मनोज पवार, सुभाष पारिक, राजेंद्र पारीक उपस्थित होते. आभार डॉ. अण्णा शिंदे यांनी मानले. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, विठ्ठलसिंग राजपूत, रंगनाथ लहाने, शेखर मांडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे, आनंद पांडे, मुन्ना खंडेलवाल, श्रीराम पवार, प्रमोद चौधरी, संदीप वर्मा, विष्णू राठोड, नगरसेवक सुनील पवार, कैलास जाधव, नारळी गुरुजी, संदीपभय्या घोंगटे, संतोष कोल्हे, बंटी सुरे, जयेश बोरसे, संतोष निकम, ज्ञानेश्वर निकम, पवन ठाकूर, अनिल खंबाट, सुमीत भारुका, प्रमोद ढोले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या वेळी शिस्तबद्ध रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. तहसील कार्यालय मार्गावर शिस्तबद्ध रॅलीने वेधले लक्ष पिशोर नाका ते तहसील कार्यालय या मार्गावर रॅली शिस्तबद्ध झाली. वातावरण उत्साही राहिले. रॅलीदरम्यान प्रशासनाला गोमाता सेवा, संरक्षण, सन्मान याबाबत निवेदन देण्यात आले. जनजागृती करण्यात आली. भारतीय संस्कृती, परंपरा जपण्याचे आवाहन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
